Home महाराष्ट्र रेल्वेमंत्र्यांंकडून पहिल्यांदाच असं उत्तर आलं की…; आदित्य ठाकरेंचा रावसाहेब दानवेंना टोला

रेल्वेमंत्र्यांंकडून पहिल्यांदाच असं उत्तर आलं की…; आदित्य ठाकरेंचा रावसाहेब दानवेंना टोला

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना लसीचे दोन डोस घेणाऱ्या नागरिकांना 15 ऑगस्टपासून लोकलने प्रवास करण्याची मंजुरी दिली आहे. यावर केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया दिली.

लोकलमध्ये प्रवास करणाऱ्यांची जबाबदारी राज्य सरकारने घ्यावी, असं रावसाहेब दानवेंनी म्हटलं. यावरून राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया देत रावसाहेब दानवेंच्या वक्तव्यावर प्रत्युत्तर दिलं आहे.

रेल्वेमंत्र्यांंकडून पहिल्यांदाच असं उत्तर आलं की, ही जबाबदारी घेणार कोण?, त्यामुळे आधीचे रेल्वेमंत्री होते त्यांनी जबाबदारीने काम केलं आहे, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी रावसाहेब दानवेंना टोला लगावला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकार श्रेयासाठी काम करत नाही. लोकांची गैरसोय होऊ नये आणि त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे लोकांचे जीव जाऊ नयेत असं आम्हाला वाटत असल्याचं आदित्य ठाकरेंनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

“मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या लोकल रेल्वेच्या निर्णयाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वागत करत आहे”

“महाराष्ट्रातील जनतेनं उचापात्या करणाऱ्या लोकांना बळी पडू नये”

“मोदी-जेटलींचं नाव क्रिकेट स्टेडियमला दिलं गेलंय, त्यांनी क्रिकेटमध्ये अशी कोणती कामगिरी केली होती?”

घरात बसलेले तीनचाकी सरकार लोकल संघर्षापुढे नमले; केशव उपाध्येंची ठाकरे सरकारवर टीका