मुंबई : बेस्ट बससेवेचा आज वर्धापनदिन आहे. वर्धापनदिनानिमित्त आज बेस्टच्या इलेक्ट्रिक बसेसचं लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडला. बेस्टच्या सर्व वाहन-चालक आणि कर्मचाऱ्यांचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी आभार मानले. त्यानंतर त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
देशाला कंडक्टरसारखा पंतप्रधान पाहिजे, जो सारखा म्हणेल आगे बढो, आगे बढो, असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटलं. बेस्टच्या सर्व कर्मचाऱ्यांनी अविरत सेवा दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. तसेच पुढील वाटचालीसाठी मी त्यांना शुभेच्छा देतो., असं उद्धव ठाकरेंनी यावेळी म्हटलं.
दरम्यान, अलिकडच्या काळात निसर्गचक्र बदलते आहे. पर्यावरण जपण्याच्या दृष्टीने इलेक्ट्रिक बससेवा हे एक क्रांतिकारी पाऊल आहे., असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
“नितीन गडकरी ब्रिलियंट माणूस, ते दगडापासूनही तेल निर्मिती करू शकतात”
हिंदूवर अन्याय करणे हा महाविकास आघाडीचा “किमान समान कार्यक्रम” झालाय; नितेश राणेंचा घणाघात
…मग आता नरेंद्र मोदी स्टेडियम चे नांव सुनील गावस्कर स्टेडियम कधी करणार?; भाई जगताप यांचा सवाल
राजीव गांधी मोठे नेते, नेहरु गांधींचं नाव बदलण्याचं या सरकारचं धोरण- संजय राऊत