Home जळगाव “शिवसेनेचे भाजपसोबत कायमचे शत्रुत्व नाही”

“शिवसेनेचे भाजपसोबत कायमचे शत्रुत्व नाही”

जळगाव : राजकारणात कोणी कोणाचे कायम शत्रू नसतात, आज भाजपसोबत केवळ मतभेद निर्माण झाले असले तरी तो पक्ष शिवसेनेचा कायमचा शत्रू नाही. असं वक्तव्य शिवसेनेच्या नेत्या आणि परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केलं आहे.

भाजप-शिवसेनेच्या युतीबाबत मी कोणतेही भाष्य करणार नाही, मात्र भविष्यात काहीही घडू शकतं. या बाबत पक्षप्रमुख, प्रवक्ते भूमिका मांडतील. मात्र ज्या वेळी या दोन्ही पक्षाची युती होती, त्या वेळी मीदेखील समन्वय समितीमध्ये होते. युतीची काडीमोड का झाली, ज्या मुद्यावर मतभेद निर्माण झाले याकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. युतीच्या वेळी जे ठरवण्यात आले त्यात विश्वासघात झाल्यामुळेच आम्ही इतर पक्षांची साथ घेतली, असं नीलम गोऱ्हे म्हणाल्या आहेत.

दरम्यान, कोरोनामुक्त गावे, गरजूंना मदत देण्यासाठी शासनाच्या योजना तसेच शिवसंपर्क मोहिमेचा आढावा घेण्यासाठी डॉ. नीलम  गोऱ्हे शुक्रवारी जळगावात आल्या होत्या. या आढावा बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत संवाद साधताना त्या बोलत होत्या.

महत्वाच्या घडामोडी –

राज ठाकरे मोठे नेते व्हावे ही महाराष्ट्राची इच्छा- चंद्रकांत पाटील

“राजीनामा द्या, अशी जनतेची मागणी”; ‘खेलरत्न’च्या नामांतरावरुन रुपाली चाकणकरांचा टोला

मुंबईत शिवसेनेची ताकद असेल तर…; चंद्रकांत पाटलांचे संजय राऊतांना आव्हान

लोकल प्रवास नाकारणारे हे तर जनविरोधी ठाकरे सरकार; कांदिवलीत भातखळकरांचं रेलभरो आंदोलन