निरपराध मुलींवर अत्याचार करून त्यांचा खून करण्याचं या सरकारला लायसन्स दिलं नाही- नारायण राणे

0
156

मुंबई : अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येच्या चाैकशीबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत यावरून भाजप नेते नारायण राणे यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

सुशांत सिंग राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालीयनच्या आत्महत्येची चाैकशी पोलिसांनी का नाही केली, असं राणे म्हणाले. माझ्या माहितीनुसार तिने आत्महत्या नाही केली, तर तिची देखील हत्या केली आहे. तिच्यावर बलात्कार करून तिला मारण्यात आलं आहे. तिच्या गुप्तांगात देखील जखमा आहेत. त्यामुळे पोलिसांंनी त्या दृष्टीने तपात करायला हवा, असं राणे म्हणाले.

दरम्यान, सुशांत सिंग प्रकरणात मुंबई पोलिस कोणाला वाचवताय, असा सवालही राणे यांनी उपस्थित केला आहे. तसेच निरपराध मुलींवर अत्याचार करून त्यांचा खून करण्याचं या सरकारला लायसन्स दिलं नाही, असंही नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

‘रक्षाबंधनाची ओवाळणी म्हणून एसटी निर्भयांची मुख्यमंत्र्यांकडे ‘ही’ मागणी

मुंबई पोलीस तुम्ही आमची शान आहात; सुशांत प्रकरणावरुन केदार शिंदेंची प्रतिक्रिया

शरद पवार आणि उद्धव ठाकरे अर्जुनासारखे गोंधळलेले- संभाजी भिडे

मनसेच्या अविनाश जाधवांचा जामीन अर्ज फेटाळला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here