Home महाराष्ट्र सामान्य मुंबईकरांना छळण्यात ठाकरे सरकारला कसा विकृत आनंद मिळतो हे दिसलं- केशव...

सामान्य मुंबईकरांना छळण्यात ठाकरे सरकारला कसा विकृत आनंद मिळतो हे दिसलं- केशव उपाध्ये

मुंबई : लोकलमधील प्रवासाच्या मुद्यावरून आता भाजप आणि काँग्रेस आमनेसामने आलेले दिसत आहे. लोकलच्या प्रवासावरुन भाजपने आंदोलनाचा इशारा दिल्यनंतर काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर निशाणा साधला होता.

भाजपने २ आॅगस्टला जाहीर केलेल्या सविनय नियमभंग आंदोलनातून पळ काढला. ब्रिटिशांविरुद्ध सविनय कायदेभंग आंदोलन देश करत होता तेव्हाही पळ काढला होता. प्रामाणिकपणा तेव्हाही नव्हता आताही नाही जनतेच्या जीवावर आंदोलन करणार होते. दुटप्पी भाजपाला ओळखलेली जनता आमच्याबरोबर आहे , असं सचिन सावंत यांनी म्हटलं होतं. यावर भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सचिन सावंत यांचं ट्विट रिट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.

धन्यवाद. तुम्ही ट्वीट केल्यामुळे महाविकास आघाडी आणि काँग्रेसला सामान्य मुंबईकरांना छळण्यात कसा विकृत आनंद मिळतो हे दिसले. आम्ही योजना बदलली आणि पितळ उघडे पडले. सामान्य मुंबईकरांच्या लोकल प्रवासावरून काल हायकोर्टाने थपडा मारल्या तरी तुमच्या सरकारला जाग आली नाही., असा टोला केशव उपाध्येंनी यावेळी लगावला.

लोकांचे प्रश्न सोडविण्यापेक्षा त्यांना छळायचे आणि आंदोलन झाले की मजा बघायची असा उरफाटा कारभार आहे. आंदोलन तर होईलच. सामान्य मुंबईकरांच्यासाठी. महापालिकेत विरोधी पक्ष म्हणून मिरवतापण सामान्य मुंबईकराच्या प्रश्नावर स्पष्ट भूमिका घेण्याच्या ऐवजी कुचेष्टा करता हेही जनता पहाते आहे, असंही केशव उपाध्येंनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

नवाब मलिकांनी राज्यापालांच्या दाैऱ्यावर बोलण्यापेक्षा…; प्रवीण दरेकरांचा नवाब मलिकांना सल्ला

खावाले काळ, नी भूईले भार म्हणजे ठाकरे सरकार’; आशिष शेलारांचा घणाघात

शिवसेनेला सोडचिठ्ठी देत ‘या’ माजी राज्यमंत्र्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश!

नवनीत राणांच्या ‘त्या’ व्हिडीओवरून रूपाली चाकणकरांचा टोला; म्हणाल्या…