नंदुरबार : भाजप आमदार आशिष शेलार आजपासून तीन दिवसाच्या उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यावेळी नंदुरबार जिल्हा दौऱ्यात संघटनात्मक आढावा घेऊन त्यांनी पत्रकारांशी संवादही साधला. त्यावेळी आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर टिका केली आहे.
राज्यातल्या जनहिताच्या विषयांकडे दुर्लक्ष करत असलेल्या सरकारच वर्णन ‘खावाले काळ, नी भूईले भार हे ठाकरे सरकार’ असंच कराव लागेल, असं म्हणत आशिष शेलार यांनी खास अहिराणी भाषेत ठाकरे सरकारवर टीका केली आहे.
नंदुरबारमध्ये यावेळी पाऊस पुरेसा झालेला नाही. दुष्काळ सदृश्य परिस्थिती दिसत आहे. 20 जुलैपर्यंत 3 लाख 5 हजार हेक्टरपैकी 1 लाख हेक्टरपर्यंत पेरणी झाली. मात्र, पावसानं दडी मारल्याने दुबार पेरणी करावी लागत आहे. पीक कर्ज देण्यात बँकांनी आखडता हात घेतला आहे. 20 हजारापेक्षा जास्त खातेधारकांनी कर्ज घेतलेले नाही अशी अवस्था आहे. जर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली तर त्याचे नियोजन हे सरकार कधी करणार? असा सवालही आशिष शेलार यांनी विचारलाय.
महत्वाच्या घडामोडी –
शिवसेनेला सोडचिठ्ठी देत ‘या’ माजी राज्यमंत्र्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश!
नवनीत राणांच्या ‘त्या’ व्हिडीओवरून रूपाली चाकणकरांचा टोला; म्हणाल्या…
राहुल गांधी राज्य सरकारच्या कामगिरीबद्दल समाधानी; संजय राऊतांची माहिती
…तर माझ्यावर रोज 100 गुन्हे दाखल करा, मी बोलत राहणार- चित्रा वाघ