Home नागपूर देवेंद्र फडणवीस हे स्वत: मुख्यमंत्री होते. त्यामुळे…; विजय वडेट्टीवारांचा टोला

देवेंद्र फडणवीस हे स्वत: मुख्यमंत्री होते. त्यामुळे…; विजय वडेट्टीवारांचा टोला

नागपूर : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस  यांनी पूरग्रस्तांच्या मदती संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवलं आहे. या पत्रावरुन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधलाय.

देवेंद्र फडणवीस हे स्वत: मुख्यमंत्री होते. त्यामुळे मदत करताना काय अडचणी येतात हे त्यांनाही ठाऊक आहे. त्यामुळे मदतीबाबत फक्त बोलून चालत नाही, असं म्हणत वडेट्टीवारांनी देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला आहे.

विरोधी पक्षाचं मागणी करणं हे काम आहे. ती त्यांची जबाबदारीच आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते. त्यामुळे मदत करताना काय अडचणी येतात ते त्यांनाही माहिती आहे. पूरग्रस्त भागांची पाहणी करताना त्यांच्या अनेक बाबी लक्षात आल्या असतील. मदतीबाबत फक्त बोलून चालत नाही. तर ती देताना अनेक अडचणी असतात. फक्त राज्य सरकारच नाही तर केंद्र सरकारनेही मदत करावी, अशी जनतेची मागणी आहे. आम्ही मदतीसाठी तयार आहोत. आम्ही ती करु सुद्धा, असं विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

“शरद पवारांमुळेच मी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली”

“उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यापासून पनवती लागली”

बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचं काम आमच्याच काळातलं; देवेंद्र फडणवीसांचा दावा

दादा…….क्या हुवा तेरा वादा; चित्रा वाघ यांचा अजित पवारांना टोला