जळगाव : पूरग्रस्त भागात सत्ताधाऱ्यांनी पाहणी दौरे केले मात्र अद्याप कोणतीही मदत जाहीर केली नाही. त्यांनी केवळ पूरग्रस्तांच्या तोंडाला पाने पुसली आहे. हे दुर्दैव आहे, असं म्हणत भाजप नेते गिरीश महाजन यांनी महाविकास आघाडीतील मंत्री आणि नेत्यांवर टीका केली आहे. ते जळगाव येथे पत्रकारांशी बोलत होते.
राज्यातील सत्ताधारी अत्यंत कठोर काळजाचे आहेत. त्यांनी पाहणी केली मात्र कोणतीही मदत न करता पुरग्रस्तांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. शासनाने पंचनामे करण्याची वाट न पाहता तातडीने पूरग्रस्तांना मदत करण्याची गरज आहे. शिवाय त्या ठिकाणी प्रशासन यंत्रणा अधिक जोमाने कामाला लागण्याची गरज आहे, असं गिरीश महाजन म्हणाले आहेत.
प्रशासन पातळीवर सर्व चालढकल सुरू आहे. आम्ही त्या ठिकाणी जावून मदत केली. मात्र त्यावेळी कोणतीही शासकीय यंत्रणा पोहचली नव्हती. शासनाचा अत्यंत भोंगळ कारभार सुरू आहे. आजपर्यंत आपण असे शासन कधीच पाहिले नव्हते, असा टोलाही गिरीश महाजन यांनी यावेळी लगावला.
महत्वाच्या घडामोडी –
“थांब रे, मध्ये बोलू नको”, नारायण राणेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया; म्हणाले…
“बाळासाहेबांचं शिवसेना भवन राहिलं नाही, ते कलेक्शन ऑफिस झालंय”
“शिवसेना प्रमुखांचा आम्ही नेहमीच आदर करतो; प्रसारमाध्यमांतून माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला”
“पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल”