मुंबई : राज्यातील पूर परिस्थिती लक्षात घेता ठाकरे सरकार महत्त्वाचा निर्णय घेणार आहे. ज्या गावांना समुद्राच्या पाण्याचा धोका आहे अशा ठिकाणी संरक्षण भिंत उभारणार आहेत. समुद्रकिनारी पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी ही संरक्षण भिंत उभारली जाणार आहे. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.
सरसकट भिंत बांधणं किती योग्य आहे हे माहीत नाही. पूर संरक्षक भिंत काही ठरावीक ठिकाणी बांधता येते. ती काही चीनच्या भिंती सारखी सरसकट बांधता येत नाही, असा टोला देवेंद्र फडणवीसांनी यावेळी लगावला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
सरसकट भिंत बांधणं किती योग्य आहे हे माहीत नाही. अर्थात शासनाने काही सांगितलं असेल. किंवा मुख्यमंत्र्यांनी काही अभ्यास केला असेल. पण पूर संरक्षक भिंत काही ठरावीक ठिकाणी बांधता येते. ती काही चीनच्या भिंती सारखी सरसकट बांधता येत नाही. त्यामुळे ती नेमकी कुठे बांधता येईल याचा विचार करावा लागेल. पूर संरक्षक भिंत बांधणं ही अनेक उपाययोजनांपैकी एक असू शकते. ती विविक्षित भागात होऊ शकते. ती सरसकट बांधता येत नाही. माझं जे छोटं ज्ञान आहे, त्यानुसार सरसकट भिंत बांधणं योग्य होणार नाही. त्यावर सरकार अभ्यास करेल, असं फडणवीसांनी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
“कोल्हापुरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस पाहणी करत असताना एकमेकांना समोरासमोर भेटले”
“…तर त्यांचे हातपाय तोडू, हा महाराष्ट्र आहे, इथं फक्त राज ठाकरेंचं राज चालतं”
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल; शिरोळ, नृसिंहवाडीत पूरस्थितीची केली पाहणी
“बाळासाहेबांचा ढाण्या वाघ आहे तो, मुख्यमंत्री आमच्या मागण्या नक्की पूर्ण करतील”