मुंबई : फडणवीस सरकारने राज्यात 72 हजार पदांची मेगाभरती जाहीर केली होती. त्यानंतर ठाकरे सरकारने या जागा भरणार असल्याचं जाहीर केलं आहे. तसंच यात वाढ करुन 29 हजार पदांची भरती करण्यात येणार आहे. त्यामुळे पदांची संख्या 1 लाख 1 हजार इतकी झाली आहे.
2 लाख रिक्त पदांपैकी 50 टक्के जागा भरण्याचा निर्णय वित्त विभागाने घेतला असून शासकीय विभागातील रिक्त पदांची माहिती संकलित करण्याचं काम सामान्य प्रशासन विभागातर्फे सुरु करण्यात आले आहे.
ठाकरे सरकारच्या मेगाभरतीत आरोग्य, शिक्षण, गृह, महसूल, कृषी आणि पशुसंवर्धन विभागातील जागा भरण्यात येणार आहेत. वर्ग- एक आणि वर्ग- दोन अधिकाऱ्यांची भरती एमपीएससी मार्फत केली जाणार आहे, तर वर्ग-तीन आणि वर्ग-चारची भरती खासगी एजन्सीद्वारे करण्यात येणार आहे.
महत्वाच्या घडामोडी-
…म्हणून बाळासाहेबांनी इंदिरा गांधीजींशी मांडवली केली; निलेश राणेंच बाळासाहेब ठाकरेंवर टिकास्त्र
सत्तेसाठी शिवसेनेने काय-काय तडजोड केली याची माहिती समोर आली पाहिजे
मुस्लिम आरक्षणाच्या मुद्दयावरुन देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनावर निशाणा; म्हणतात…
“मराठा तरूणांना न्याय देण्यास ठाकरे सरकार असमर्थ”