Home महाराष्ट्र “अजितदादांनी भाषेबद्दल बोलणं म्हणजे, राज कुंद्रांनी कुठला पिक्चर बघावा हे सांगण्यासारखं”

“अजितदादांनी भाषेबद्दल बोलणं म्हणजे, राज कुंद्रांनी कुठला पिक्चर बघावा हे सांगण्यासारखं”

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या चिपळूण दौऱ्यात अधिकाऱ्यांना झापताना त्यांनी मुख्यमंत्र्यांवर खालच्या भाषेत टीका केली होती. यावरून अजित पवारांनी संताप व्यक्त केला होता. यावर भाजप नेते नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

कुठली भाषा वापरावी हे अजितदादांनी सांगावं, हे म्हणजे राज कुंद्रांनी कुठला चित्रपट बघावा असं सांगण्यासारखं आहे. म्हणून भाषेबद्दल अजितदादांनी बोलू नये, असा हल्लाबोल नितेश राणेंनी यावेळी केला. ते सिंधुदुर्गमध्ये माध्यमांशी बोलत होते.

दरम्यान, नारायण राणेंनी अधिकाऱ्यांना झापताना मुख्यमंत्र्यावर खालच्या शब्दात टीका केली होती.  मी चिपळूणमधली सगळी पाहणी करुन झाली तरी एकही अधिकारी मला येऊन आणखी भेटला नाही, हे काही बरोबर नाही, हे मी खपवून घेणार नाही, अशी तंबी राणेंनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली. त्यावर अधिकारी सीएमसाहेबांना निरोप देण्यासाठी गेले आहेत, असं समोरील अधिकाऱ्याने सांगताच, सीएम गेला उडत… मला कुणाची नावं सांगू नका, असा हल्लाबोल राणेंनी केला होता. यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली. हे लोक दौरा अधिकार्‍यांना पाहण्यासाठी करतात का? मुख्यमंत्र्यांबाबत एवढ्या खालच्या स्तराची भाषा कधीही, कुणीही वापरली नव्हती. यशवंतराव चव्हाणांपासून, शरद पवारांपर्यंत अनेक मुख्यमंत्री झाले. मात्र अशी भाषा कोणत्याही विरोधी पक्षाने किंवा त्यांच्या पक्षातील इतर नेत्यांनी वापरली नाही, असं म्हणत अजित पवारांनी संताप व्यक्त केला.

महत्वाच्या घडामोडी –

शिववडा, शिवथाळीच्या अद्भूत यशानंतर आता शिव भिंत; अतुल भातखळकरांचा टोला

“सांगलीकरांच्या चिंतेत वाढ! कृष्णेची पाणी पातळी वाढणार, पुढच्या आठवड्यात मुसळधार पावसाचा अंदाज”

चंद्रकांत पाटलांना भाषणाच्या क्लिप पाठवल्या नाहीत, बैल मुततो तशा भूमिका बदलत नाही- राज ठाकरे

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात मला कायम सुसंस्कृतपणा आणि संयमीपणा दिसला- अमोल कोल्हे