मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यात पुरामुळे मोठं नुकसान झालं. रायगड, रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यात दरड कोसळून 100 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. तर चिपळूण, महाड, सांगली, कोल्हापुरातील महापुरामुळं झालेलं नुकसान न भरून येणारं आहे. तसेच महापूरामुळे अनेक घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. याच पार्श्वभूमीवर अभिनेत्री दिपाली सय्यद हिने कोल्हापूरमधील पूरग्रस्त भागाची पाहणी केली.
दिपाली सय्यदनं कोल्हापूरातील भुदरगड तालुक्यात जाऊन पाहणी केली आणि पूरग्रस्तांचे अश्रूही पुसले. त्यासोबतच दिपाली सय्यदनं 10 कोटी रूपयांची मदत जाहीर केली आहे. यानंतर दिपाली सय्यदनं आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. भयंकर आहे हे सगळं. जेंव्हा प्रत्येकाशी मी बोलत होते, तेंव्हा अंगावर काटा येत होता. लोक रडत आहेत. छत नाही, संसार उघडे पडले असून प्रत्येक घराघरात एकच चित्र असल्याचं दीपाली सय्यदनं म्हटलं.
दरम्यान, कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, चिपळूण अशा भागात मोठं नुकसान झालं आहे. काहीच उरलं नाही. 2 वर्षे कोरोना महामारीत गेलं. कामधंदा बंद आहे. त्यात निसर्गाचा प्रकोप आहे. गावंच्या गावं उद्ध्वस्त झालं आहे. काही उरलं नाही. हे बघताना भयानक वाटलं. देव किती परीक्षा घेणार? स्ट्राँग आहे म्हणून अजून किती परीक्षा द्यायच्या., अशी भावना दिपाली सय्यदनं यावेळी व्यक्त केल्या.
महत्वाच्या घडामोडी –
मी काय राज कुंद्रा आहे का?; राज ठाकरेंचा खोचक सवाल
‘माझी प्रकृती उत्तम, काळजीचं कारण नाही’; जयंत पाटलांनी दिली माहिती
पुरग्रस्तांचे हाल बघून उर्मिला मातोंडकरांना झाले अश्रू अनावर; केली ‘ही’ मदत
BREAKING NEWS! जयंत पाटील ब्रीच कँडी रूग्णालयात; अस्वस्थ वाटू लागल्याने मंत्रिमंडळ बैठक अर्धवट सोडली