मुंबई : अटक होऊ नये म्हणून आणीबाणीमध्ये इंदिरा गांधीजींशी बाळासाहेबांनी मांडवली केली, असं म्हणत भाजपचे नेते निलेश राणे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यावर टिका केली आहे.
बाळासाहेब ठाकरे स्वातंत्र्य लढ्यात होते का? की त्यांच्या अगोदर कोण ठाकरे होते? अटक होऊ नये म्हणून आणीबाणीत इंदिरा गांधीजींशी बाळासाहेबांनी मांडवली केली. तो इतिहास लोकं विसरलेली नाही,’ असं म्हणत निलेश राणे यांनी थेट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरच निशाणा साधला.
स्व. बाळासाहेब होते का स्वतंत्र लढ्यात??? की त्यांच्या अगोदर कोण ठाकरे होते??? अटक होऊ नये म्हणून आणी बाणीत स्व. इंदिरा गांधीजीशी मांडवल्ली केली बाळासाहेबांनी तो इतिहास लोकं विसरलेली नाही. https://t.co/eUq04Bvxll
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) February 27, 2020
दरम्यान, वीर सावरकरांचे स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान होतेच, पण स्वातंत्र्य चळवळीत भाजप किंवा तेव्हाचा ‘संघ’ परिवार कोठे होता? 1947 साली स्वातंत्र्यदिनही संघाने मानला नाही व राष्ट्रध्वज तिरंगा संघ मुख्यालयावर फडकवला नाही,’ असं म्हणत शिवसेनेनं राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार टीका केली होती. यावर भाजपचे नेते निलेश राणे यांनी शिवसेनेला प्रत्यृत्तर दिलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
सत्तेसाठी शिवसेनेने काय-काय तडजोड केली याची माहिती समोर आली पाहिजे
मुस्लिम आरक्षणाच्या मुद्दयावरुन देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनावर निशाणा; म्हणतात…
“मराठा तरूणांना न्याय देण्यास ठाकरे सरकार असमर्थ”
मुख्यमंत्री काही करत नाहीत सगळं अजित पवार करतात- नारायण राणे