मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूरग्रस्तांना केलेल्या मदतीबद्दलच्या भूमिकेवर भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी टीका केली आहे. भाजपा प्रदेश कार्यालयात सोमवारी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
सहकारी साखर कारखान्यांनी व अन्य सहकारी संस्थांनी थकविलेली 3800 कोटींची देणी सरकारी तिजोरीतून देण्याची तत्परता दाखविण्यासाठी समिती नेमणाऱ्या ठाकरे सरकारनं पूरग्रस्त भागातील जनतेच्या भावनांची कुचेष्टा केली, असं म्हणत संकटग्रस्त जनतेच्या हितापेक्षा कर्जबुडव्यांबद्दल कळवळा दाखविणारे ठाकरे सरकार ढोंगी आहे. कर्जबुडव्या बड्या धेंडांसाठी पायघड्या घालत सामान्य संकटग्रस्तांसमोर आर्थिक अडचणीचे पाढे वाचणाऱ्या ठाकरे सरकारची असंवेदनशीलता उघड झाली आहे, अशी टीका केशव उपाध्ये यांनी केली आहे.
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संकटग्रस्त भागात हवाईमार्गे केलेला धावता दौरा हा सवंग लोकप्रियतेचाच प्रकार असून, कोणतीही मदत न देता व दुःखातून सावरण्याची जबाबदारीही संकटग्रस्तांवरच सोपवून हात हलवत माघारी येण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी घरातूनच आढावा घेतला असता, तर मदत यंत्रणेवरील ताण तरी वाचला असता, असंही केशव उपाध्ये म्हणाले आहेत.
दरम्यान, कोकणातील चिपळूण या पूरग्रस्त शहरात तसेच त्याआधी रायगड जिल्ह्यातील तळिये या गावी जाऊन मुख्यमंत्री ठाकरे यांनी संकटग्रस्तांना दिलासा देण्याऐवजी त्यांच्या भावनांचाच अपमान केला आहे”, असा आरोपही केशव उपाध्ये यांनी यावेळी केला.
मुख्य प्रवक्ते श्री. केशव उपाध्ये यांची पत्रकार परिषद. https://t.co/RkCreLyml6
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) July 26, 2021
महत्वाच्या घडामोडी –
मुख्यमंत्र्यांचे पाय पांढरे आहेत का, हे एकदा पहावं लागेल- नारायण राणे
5 जिल्ह्यांच्या किनारपट्टी भागात संरक्षण भिंत उभारणार; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय
“मत मागायला याल, तेंव्हा कोकणी माणूस तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही”