Home महत्वाच्या बातम्या ओबीसींबद्दल केंद्राला राग, समाजाचे नुकसान करण्याचं केंद्र सरकारचं षडयंत्र

ओबीसींबद्दल केंद्राला राग, समाजाचे नुकसान करण्याचं केंद्र सरकारचं षडयंत्र

गोंदिया : ओबीसींचं अतिरिक्त राजकीय आरक्षण रद्द झाल्यानंतर ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. याच पार्श्वभूमीवरुन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधलाय.

ओबीसी समाजाचे नुकसान करण्याचा षडयंत्र केंद्र सरकारने ठरवलं आहे. केंद्र सरकारने ओबीसी समाजाची जनगणना करणार नाही, असे सांगितले आहे. त्यामुळे ओबीसी समाजाबद्दल केंद्राचा राग किती आहे, हे लक्षात येते, असा आरोप नाना पटोलेंनी केला आहे.

“मी विधानसभा अध्यक्ष असताना पहिला ओबीसी आरक्षणाचा ठराव मांडला होता. मात्र, ओबीसी समाजाचे नुकसान करण्याचे षडयंत्र  केंद्र सरकारने ठरवलं आहे. त्यामुळे केंद्र सरकारने ओबीसी समाजाची जनगणनाही करणार नाही आणि आकडेसुद्धा देणार नाही, असे केंद्रीय गृहमंत्र्यांनी लोकसभेत सांगितले. त्यामुळे ओबीसी समाजाबद्दल केंद्राचा किती राग आहे हे लक्षात येते,” असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“मोठी बातमी! कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांचा राजीनामा”

भास्कर जाधव तमाशातील सोंगाड्या आणि दशावतारातील शंकासुरच; नितेश राणेंचा घणाघात

“महाडचे माजी आमदार व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माणिकराव जगताप यांचं निधन”

पूरग्रस्तांना तातडीची 10 हजारांची मदत; राज्य सरकारची मोठी घोषणा