सिंधुदुर्ग : मुख्यमंत्री काही करत नाहीत सगळं अजित पवार करतात, असं म्हणत माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या गौरवाचा ठराव मांडण्यात कसलीही अडचण नव्हती. पण या प्रस्तावामुळे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी नाराज झाल्या असत्या आणि त्यांनी पाठिंबा काढून घेतला आसता तर घरी जावं लागलं असतं, असं नारायण राणे म्हणाले आहेत.
मी सत्ताधारी पक्षाचा निषेध करतो. काँग्रेस आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष कुणासाठीही सत्तेत नाहीत. ते स्वत:च्या फायद्यासाठी एकत्र आले आहेत, असंही नारायण राणे यांनी म्हटलं आहे.
विधानसभेमध्ये सावरकरांचा गौरवाचा प्रस्ताव अध्यक्षांनी फेटाळला. मी अध्यक्षांना काही बोलत नाही. मात्र सत्ताधाऱ्यांना विचारतो कायद्यापेक्षा स्वातंत्र्यवीर सावरकर मोठे नाहीत का?, असा सवालही राणेंनी यावेळी केला.
महत्वाच्या घडामोडी-
अमृता फडणवीस यांना आवरा; शिवसेनेचं भैय्याजी जोशी यांना पत्र
ही दडपशाही बघून हिटलरने सुद्धा शरमेने मान खाली घातली असती; जितेंद्र आव्हाड आक्रमक
“सावरकर हे भाजपसाठी श्रद्धेचा विषय नसून राजकारणाचा विषय”
..तर ते भ्रमात आहेत; शिवसेनेचा सामनातून भाजपवर निशाणा