मुंबई : राज्यात गेल्या तीन चार दिवसांपासून पावसाने जोरदार तडाखा लावलेला आहे. अतिवृष्टीमुळे सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये पुराचा धोका वाढला आहे. तसचं महाडमधील तळीये गावात सर्वात मोठी दुर्घटना घडली असून आतापर्यंत 45 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये एकूण 85 जणांचा मृत्यू झाला आहे. यावरुन आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
“स्वतःचे मुख्यमंत्री पद वाचवण्यासाठी काळी जादू आणि पूजा मुख्यमंत्री स्वतःच्या घरी करत असतात असे आम्ही ऐकतो..तशीच आता एकदा महाराष्ट्राला शांत करण्यासाठी महापूजा करावी, जेणेकरून 28 नोव्हेंबर 2019 ला लागलेली पणवती एकदाचीच काय ती दूर होईल”, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, सरकारकडून या नागरिकांसाठी खूप उशिराने मदत मिळाली आहे. त्यामुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. आम्ही घटनास्थळी दाखल झालो असता सरकारकडून कोणतीही मदत मिळत नसल्याचं स्थानिकांनी सांगितलं. पुरातून बाहेर काढण्यासाठी बोटी पाठवण्यात आल्या नाहीत. अधिकारी नेटवर्कमध्ये नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसह त्यांच्या मंत्र्यावर गुन्हे दाखल करा, अशी मागणीही नितेश राणे यांनी केली आहे.
स्वतःचे मुख्यमंत्री पद वाचवण्यासाठी काळा जादू आणि पूजा मुख्यमंत्री स्वतःच्या घरी करत असतात असे आम्ही ऐकतो..
तशीच आता एकदा महाराष्ट्राला शांत करण्यासाठी महापूजा करावी, जेणेकरून २८ नोव्हेंबर २०१९ ला लागलेली पणवती एकदाचीच काय ती दूर होईल !!— nitesh rane (@NiteshNRane) July 24, 2021
महत्वाच्या घडामोडी –
तळीये गावाच्या पुनर्वसनाची जबाबदारी ‘म्हाडा’ने स्वीकारली; जितेंद्र आव्हाडांची घोषणा
“सांगली, कोल्हापूरातील पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारने तातडीने पाऊले टाकण्याची गरज”
मुख्यमंत्र्यांचा महाड दाैरा म्हणजे वराती मागून घोडे; प्रवीण दरेकरांचा घणाघात
सांगली जिल्ह्याला पुराचा फटका, मात्र सुदैवानं 2019 सारखी परिस्थिती नाही- विश्वजित कदम