Home महाराष्ट्र तळीये गावाच्या पुनर्वसनाची जबाबदारी ‘म्हाडा’ने स्वीकारली; जितेंद्र आव्हाडांची घोषणा

तळीये गावाच्या पुनर्वसनाची जबाबदारी ‘म्हाडा’ने स्वीकारली; जितेंद्र आव्हाडांची घोषणा

मुंबई : राज्यात गेल्या तीन चार दिवसांपासून पावसाने जोरदार तडाखा लावलेला आहे. राज्यातील अनेक भागात पूर आला असून अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत.

महाड तालुक्यातील तळीये गावातील 32 घरं दरडीखाली गाडली गेली. मातीच्या ढिगाऱ्याखालून आतापर्यंत 40 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. ढिगाऱ्याखाली अजून अनेक मृतदेह असल्याची शक्यता जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी महाडमधील तळीये गावात जाऊन या भागाची पाहणी केली.

सरकारतर्फे गावकऱ्यांना संपूर्ण नुकसान भरपाई दिली जाईल तसेच त्यांचे पुनर्वसन केले जाईल, असं उद्धव ठाकरे म्हणाले. यावर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली.

कोकणामध्ये दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे बाधित झाले तळीये ता. महाड हे पूर्ण गाव वसविण्याची जबाबदारी म्हाडाने स्विकारली आहे. मा. मुख्यमंत्री महोदयांनी जो शब्द दिला कि कोणालाही अडचण भासू देणार नाही. ती पूर्ण करायला ही सुरुवात आहे. ही सूचना मला पवार साहेबांनी केली होती. , असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

“सांगली, कोल्हापूरातील पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारने तातडीने पाऊले टाकण्याची गरज”

मुख्यमंत्र्यांचा महाड दाैरा म्हणजे वराती मागून घोडे; प्रवीण दरेकरांचा घणाघात

सांगली जिल्ह्याला पुराचा फटका, मात्र सुदैवानं 2019 सारखी परिस्थिती नाही- विश्वजित कदम

सरकारतर्फे संपूर्ण नुकसान भरपाई दिली जाईल; महाड दाैऱ्यात मुख्यमंत्र्यांचं गावकऱ्यांना आश्वासन