सातारा : महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसानं थैमान घातलं आहे. सातारा जिल्ह्यातील वाई आणि पाटण तालुक्यात दरड कोसळण्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफची टीम साताऱ्यात दाखल झाली.
पाटण तालुक्यातील मोरणा विभागात असणाऱ्या आंबेघर येथे दरड कोसळण्याची घटना घडली आहे. गुरुवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली असून आंबेघर येथील काही घरे या मातीच्या ढिगाऱ्याखाली गेली आहेत. या घटनेची माहिती समजताच काही ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले आहेत. मात्र त्याठिकाणी तीन कुटुंबातील लोक रात्रीपासून बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने मदत कार्य सुरू केले आहे. मुसळधार पावसामुळे या भागातील प्रमुख रस्ते पाण्याखाली गेले आहेत. तसेच पाटण तालुक्यातील ढोकावळे येथेही घरांची पडझड होऊन मातीच्या ढिगाऱ्याखाली काही लोक अडकल्याचे सांगण्यात येत आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“सांगलीकरांची चिंता वाढणार! कृष्णेची पाणी पातळी 52 फुटांपर्यंत जाण्याची शक्यता”
“देशमुखांचं समर्थन करणाऱ्या ठाकरे सरकारचंही ‘तोंड’ काळं झालं”
महाराष्ट्रात पूरस्थिती; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन, म्हणाले…
मोठी बातमी! खडकवासला 100 टक्के भरण्याच्या मार्गावर, पुणेकरांच्या पिण्याच्या पाण्याचं संकट मिटलं