Home महाराष्ट्र फोन टॅपिंग मोदींच्या नव्हे, तर मनमोहन सिंग यांच्या काळातील- देवेंद्र फडणवीस

फोन टॅपिंग मोदींच्या नव्हे, तर मनमोहन सिंग यांच्या काळातील- देवेंद्र फडणवीस

नवी दिल्ली : पेगसास स्पायवेअरद्वारे राजकीय नेते आणि पत्रकारांचे फोन टॅप केल्याच्या बातम्या समोर आल्यानं देशात खळबळ उडाली आहे. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत प्रतिक्रिया दिली आहे.

फोन टॅपिंगच्या मुद्द्यावरून विरोधक संसदेत गोंधळ घालत आहेत. पण केंद्र सरकारने कुणाचेही फोन टॅप केले नाहीत. विरोधकांचे आरोप दिशाभूल करणारे आहेत, असा खुलासा देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला. तसेच फोन टॅपिंग मोदींच्या नव्हे तर माजी पंतप्रधान डाॅ. मनमोहन सिंग यांच्या काळात झाल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला.

भारतीय संसदेचं अधिवेशन डिरेल करण्याचा प्रयत्न विरोधी पक्षाकडून होतोय. मंत्रिमंडळाचा विस्तार करून सर्व जातीधर्माच्या लोकांना मोदींनी संधी दिली. त्यामुळे अधिवेशन डिरेल करण्याच्या उद्देशानं अधिवेशनाचं कामकाज डिस्टर्ब केल जात आहे.

दरम्यान, पॅगसेसच्या बातमीला कोणताही आधार नाही. भारत सरकारची कोणतीही एजन्सी अशा कोणत्याही पद्धतीची हॅकींग करत नाही, असं फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केलं.

महत्वाच्या घडामोडी –

“शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात हे झारीतील शुक्राचार्य”

“अश्लिल चित्रपटाच्या चित्रीकरणावरून शिल्पा शेट्टीचे पती, प्रसिद्ध उद्योजक राज कुंद्रा यांना अटक”

आम्हाला पुन्हा आषाढी वारीत तुडूंब भरलेलं पंढरपूर पहायचं आहे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

“बा विठ्ठला, आमचे मुख्यमंत्री जसे स्वतः गाडी चालवत तुझ्या भेटीला आले तसेच मंत्रालयातही जाऊ दे”; मनसेचा टोला