Home महाराष्ट्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे राजकीय आरक्षण रद्द झालं- देवेंद्र फडणवीस

सरकारच्या नाकर्तेपणामुळे राजकीय आरक्षण रद्द झालं- देवेंद्र फडणवीस

मुंबई : सरकारच्या वेळेकाढूपणामुळेच राजकीय आरक्षण गेलं आहे, असं म्हणत विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आरक्षणावरून महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडलं. आज ओबीसी आरक्षणाच्या अभियानाचा शुभारंभाचा सोहळा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.

विधानसभेत ठराव पास केला जातो, की केंद्र सरकारने आम्हाला सेन्सस डेटा उपलब्ध करून द्यावा. हे षडयंत्र आहे. 60 ते 70 टक्के स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या फेब्रुवारीत येणार आहेत. फेब्रुवारीपर्यंत टाईमपास करायचा. फेब्रुवारीला या निवडणुका संपल्या, की पुढची सात वर्षे ओबीसी आरक्षण देऊनही फायदा नाही. त्या आरक्षणाचा लाभच मिळणार नाही. म्हणून केंद्राने डेटा द्यावा,असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

दरम्यान,मी संन्यास घेईन हे मी जाणीवपूर्वक बोललो. पुढची 25 वर्षे मला भारतीय जनता पक्षात काम करायचं आहे. तरी मी जबाबदारीने बोललो कारण मला माहिती आहे, हे आरक्षण दिलं जाऊ शकतं. ओबीसींचं आरक्षण रद्द झालेलं नाही. केवळ इम्पेरिकल डेटा सादर न केल्याने ओबीसींचं महाराष्ट्रातील आरक्षण स्थगित करण्यात आलं आहे. देशातलं आरक्षण रद्द झालेलं नाही. केवळ महाराष्ट्राचं आरक्षण रद्द झालेलं आहे. सरकारच्या नाकर्तेपणामुळे झालं आहे, असंही पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“केवळ याच जन्मात नाही, तर पुढच्या जन्मातही पंकजा मुंडे भाजपमध्येच राहतील”

“काँग्रेसचा मोठा निर्णय! काँग्रेस अध्यक्षपदी म्हणून माजी क्रिकेटर नवज्योत सिंग सिद्धू यांची नियुक्ती”

“2017 ला मुंबई तुंबली त्याला मुख्यमंत्री जबाबदार आणि 2021 मध्ये पाऊस…ऐसा कैसा चलेगा”

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पंतप्रधान करा-पृथ्वीराज चव्हाण