मुंबई : केंद्रातील मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात भाजप खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद न मिळाल्यानं प्रीतम मुंडे आणि पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चा होत्या. यावर, पंकजा मुंडेंनी पत्रकार परिषद घेत मी आणि प्रीतम मुंडे नाराज नाही, असं म्हणत चर्चांना पूर्णविराम दिला होता. यावर आता भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पक्षावर प्रेम करणारे कार्यकर्ते कधीकधी पक्षातील इतर नेत्यांच्या तुलनेत विशिष्ट नेत्यांवर थोडं जास्त प्रेम करतात. अशा काही लोकप्रतिनिधींनी आणि पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांना समजावताना पंकजा मुंडे यांनी काही शब्दांचा उल्लेख केला असेल. मात्र, त्याचा अर्थ असा होत नाही की पंकजा मुंडे नाराज आहेत., असं मुनगंटीवार यांनी म्हटलं. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
दरम्यान, पंकजा मुंडे भाजपच्या प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. त्या शेवटच्या श्वासापर्यंत पक्षाच्या बाहेर जाण्याचा विचार देखील करु शकत नाहीत. केवळ याच जन्मात नाही तर पुढील जन्मातही पंकजा मुंडे भाजपमध्येच राहतील, असा विश्वास मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केला.
महत्वाच्या घडामोडी –
“2017 ला मुंबई तुंबली त्याला मुख्यमंत्री जबाबदार आणि 2021 मध्ये पाऊस…ऐसा कैसा चलेगा”
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पंतप्रधान करा-पृथ्वीराज चव्हाण
“पावसामुळे लोक मेले तरी मुख्यमंत्री घर सोडायला तयार नाहीत”