मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा आशीर्वाद आहे म्हणून उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदावर आहेत, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केलं होतं. या वक्तव्याला शिवसेनेकडूनही सडेतोड प्रत्युत्तर देण्यात आलं. राष्ट्रवादी कोणाच्या सहकार्याने सत्तेत आली असा प्रश्न शिवसेनेकडून राष्ट्रवादीला विचारण्यात आला. या वादात आता काँग्रेसनेही उडी घेतली आहे.
खासदार अमोल कोल्हे म्हणतात पवार साहेबांमुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री, शिवसेना म्हणते आमच्या सहकार्याने राष्ट्रवादी सत्तेत, पण कृपा करून दोन्ही पक्षांनी याचा विसर पडू देऊ नका की, काँग्रेसमुळे आपण सत्तेत आहात, तसा विसर पडत नाही पण आठवन दिलेली बरी”, असं ट्विट करत काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांनी केलं आहे.
दरम्यान, या सर्व प्रकरणात काँग्रेस- शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षातील नेते एकमेकांवर टीका करत असल्याने महाविकास आघाडी सरकारमधील अंतर्गत कुरबुरी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळत आहे.
खा.कोल्हे म्हणतात पवार साहेबांन मुळे मा.उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री शिवसेना म्हणते आमच्या सहकार्याने राष्ट्रवादी सत्तेत पण कृपा करून दोन्ही पक्षांना याचा विसर पडू देऊ नका काँग्रेस मुळे आपण सत्तेत आहात तसा विसर पडत नाही म्हणा पण आठवण दिलेली बरी @TV9Marathi @kolhe_amol @NANA_PATOLE https://t.co/S4K8XWHAMM
— Dr. Raju waghmare (@drrajuwaghmare) July 18, 2021
महत्वाच्या घडामोडी –
“2024 ची वाट पहावी लागणार नाही, मोदी सरकार लवकरच कोसळणार”
“योगी आदित्यनाथ पुन्हा मुख्यमंत्री झाल्यास मी उत्तर प्रदेश सोडून जाईन”
“…मग राष्ट्रवादी कोणाच्या सहकार्याने सत्तेत?”; शिवसेनेचा सवाल
“…अन्यथा मुख्यमंत्र्यांना घराबाहेर पडू देणार नाही”