मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेश सरकारचं कोरोना काळातील कामाबाबत कौतुक केलं. यावर काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी प्रतिक्रिया देत योगी सरकारवर निशाणा साधला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्टिफिकेट दिलं म्हणून योगी सरकारच्या यूपीमधील कोरोनाच्या दुसर्या लाटे दरम्यान आक्रमक क्रूरता, दुर्लक्ष आणि अव्यवस्थाचे सत्य लपत नाही, असा हल्लाबोल प्रियांका गांधींनी यावेळी केला.
लोकांना अनेक संकटांना तोंड द्यावं लागलं, असहाय्यपणे अडचणींचा सामना करावा लागला. नरेंद्र मोदी हे सत्य विसरू शकतात. पण ज्यांनी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे भोगावा लागणारा त्रास सहन केला आहे ते कधीच विसरू शकणार नाही, असंही प्रियांका गांधींनी ट्विटमध्ये म्हटलं.
मोदी जी के सर्टिफिकेट से यूपी में कोरोना की दूसरी लहर के दौरान योगी सरकार की आक्रामक क्रूरता, लापरवाही और अव्यवस्था की सच्चाई छिप नहीं सकती।
लोगों ने अपार पीड़ा, बेबसी का सामना अकेले किया। इस सच्चाई को मोदीजी, योगीजी भूल सकते हैं, जिन्होंने कोरोना का दर्द सहा, वे नहीं भूलेंगे
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) July 16, 2021
महत्वाच्या घडामोडी –
…त्यामुळे विरोधकांनी शरद पवारांना बळीचा बकरा बनवू नये- रामदास आठवले
“मुंबईत झोपड्या जमीनदोस्त करण्यास सुरूवात; अतुल भातखळकरांना पोलिसांनी घेतलं ताब्यात”
राजकीय सूडाचा आरोप करणाऱ्यांना ही चपराक- प्रवीण दरेकर
मुंबईत मनसेला धक्का, विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकरांचा शिवसेनेत प्रवेश