Home महाराष्ट्र “वारकऱ्यांच्या प्रश्नांवर हे सरकार, कान असून पण बहिरेपणाची भूमिका घेत आहे”

“वारकऱ्यांच्या प्रश्नांवर हे सरकार, कान असून पण बहिरेपणाची भूमिका घेत आहे”

मुंबई : करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यंदा दुसऱ्या वर्षीही पंढरपूरच्या आषाढी यात्रेवर कठोर निर्बंध घालण्यात आलेले आहेत. तसेच, 17 ते 25 जुलैपर्यंत नऊ दिवस पंढरपूर व परिसरातील नऊ गावांमध्ये संचारबंदी लागू केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर आज विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महाविकासआघाडी सरकारवर जोरदार टीका केली.  ते अकलुज येथे माध्यमांशी बोलत होते.

वारकऱ्यांच्या प्रश्नांवर हे सरकार, कान असून पण बहिरेपणाची भूमिका घेत आहे. या सरकारच्या संवेदना गोठल्या आहेत.” असं म्हणत प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

वारकऱ्यांबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दोनदा भूमिका मांडली. परंतु आता हे सरकार कान असून बहिऱ्यासारखं वागत आहे किंबहुना त्यांच्या संवेदनाच गोठल्या आहेत. यांच्या संवेदना असत्या तर आज आमची मंदिरं, देव-दैवतं कुलुपात राहिली नसती. यांनी काँग्रेसशी हात मिळवणी करून, आपले देव, देश, धर्म सगळं काही बासनात गुंडाळलं आहे. असंही प्रवीण दरेकर म्हणाले आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

पुण्याची मस्तानी, चितळेंची बाकरवडी ” जगात भारी” तसाच तो सर्वे वाटतोय; मनसेचा मुख्यमंत्र्यांना टोला

शरद पवार राष्ट्रपती होणार यात तथ्य नाही- नवाब मलिक

“वडिलांप्रमाणे भूमिका निभावली म्हणून ते लोकप्रिय मुख्यमंत्री झाले; पवारांकडून उद्धव ठाकरेंचं काैतुक”

“राज्यात सुरू असलेल्या वसुलीचा रिमोट कंट्रोलही शरद पवार आहेत का?”