Home महाराष्ट्र …म्हणून नाना पटोले यांचे फोन चोरून ऐकण्यात आले- संजय राऊत

…म्हणून नाना पटोले यांचे फोन चोरून ऐकण्यात आले- संजय राऊत

मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर पाळत ठेवली जात आहे, असं त्यांनी म्हटलं होतं. विधिमंडळ अधिवेशनात नानांनी पाळत ठेवल्याचा मुद्दा मांडला. काही महत्त्वाच्या नेत्यांचे फोन टॅप झाले. त्यात नाना पटोलेंचाही समावेश होता. यावर शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नाना पटोलेंचा फोन का टॅप झाला असावा, याचा अंदाज व्यक्त केला आहे.

फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी लागली आहे. सरकार एखाद्याचे फोन ‘टॅप’ करीत असेल म्हणजे एक तर तो देशविघातक कारवायांत सहभागी असायला हवा, नाही तर त्या व्यक्तीपासून सरकारला धोका आहे, असे समजायला हवे. नाना दुसऱ्या प्रकारात मोडतात. नानांमुळे सरकार पडेल किंवा नवे सरकार येईल, असे पोलीस खात्यातील फडणवीसांच्या अंधभक्तांना तेव्हा वाटले असेल. त्यातून नानांचे फोन चोरून ऐकण्यात आले, असा अंदाज संजय राऊतांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, नाना पटोले यांचे फोन चोरून ऐकले जात आहेत तसे ते अनेकांचे ऐकले जात असावेत. महाराष्ट्रातले सरकार दिल्लीश्वरांच्या डोळ्यांत खुपत आहे. मनात सलते आहे. हे सरकार अस्थिर करण्यासाठी केंद्राने जी महापूजा मांडली आहे त्यातला तीर्थप्रसाद म्हणजे नानासारख्यांचे फोन ऐकणे. त्यांच्यावर हेरगिरी करणे. नाना त्यामुळे जास्तच उसळून उठले, असं सामनात म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

चंद्रकांत पाटील म्हणजे निरागसतेचं लेणं, एक निष्पाप बालक”

“पुण्याच्या पिंपरी चिंचवडमधील भाजप नगरसेविका अर्चना बारणे यांचं निधन”

मी संपले असते तर मला संपवायचे प्रयत्नही संपले असते; पंकजा मुंडेंचा भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा

“अशांना मंत्री केल्याने शिवसेनेला फरक पडत नाही”