सांगली : वेंगुर्ला येथे आयोजित कार्यक्रमांमध्ये शिवसेना खासदार विनायक राऊत व भाजप आमदार नितेश राणे एकाच व्यासपीठावर दिसले होते. या व्यासपीठावर भाजप-शिवसेनेचे नेते एकत्रित उपस्थित असल्याने भाजप-सेनेच्या युतीच्या चर्चांना उधाण आलं आहे.
सिंधुदूर्ग जिल्हा, कोकण आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी कोणासोबतही एकत्र काम करण्याची वेळ आली आणि आमच्या पक्षनेतृत्वाचा आदेश आला तर आम्ही सगळे कार्यकर्ते खांद्याला खांदा लावून काम करु,” असं नितेश राणेंनी म्हटलं होतं. यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली.
आशिष शेलार यांनी नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्याचं तोंडभरून काैतुक केलं. नितेश राणे जे बोलले ते त्यांची प्रगल्भता आहे आणि ही प्रगल्भता दुर्दैवाने शिवसेनेकडे नाही, असा टोला आशिष शेलार यांनी यावेळी म्हटलं. ते सांगलीमध्ये एका आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
महत्वाच्या घडामोडी –
“संभाजी भिडे यांना महाराष्ट्रातून तडीपार करा”
नाना पटोलेंची भूमिका मविआला सुरूंग लावणारी- अजित पवार
नाना पटोलेंनी स्वबळाचा नारा देताच शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पायाखालची जमीन सरकली- प्रवीण दरेकर
“कोरोना संकट काळात उद्धव ठाकरेंसारखा मुख्यमंत्री झाला नसता, हे त्यांनी आपल्या कार्याने दाखवून दिलं”