सागंली : महाविकास आघाडीचं सरकार जास्त काळ टिकणार नाही. त्यामुळे भाजप-शिवसेनेनं एकत्र यावं. आपण मिळून सरकार स्थापन करु, असं वक्तव्य केंद्रीय सामाजक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. ते मिरज येथील एका कार्यक्रमादरम्यान बोलत होते.
महाविकास आघाडीमध्ये तीन पक्षांचा सामावेश आहे. त्यामुळे तिन्ही पक्षांमध्ये वौचारिकल वाद आहेत. नारायण राणेंनी म्हणल्या प्रमाणे हे सरकार 11 नाही तर 15 दिवसात पडेल, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.
रामदास आठवले यांनी महाविकास अघाडीवर टीका केली. यावेळी राज्यात ठाकरे सरकार आल्यामुळे महिलांवर आत्याचाराचं प्रमाण वाढलं आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी केलेली कर्जमाफीची घोषणाही फसवी निघाली, असा आरोपही त्यांनी केला.
महत्वाच्या घडामोडी-
भाजपचा ‘हा’ नेता म्हणतो…कदाचित अजित पवारांना पुन्हा आमच्याबरोबर यायचंय
आता बळीचं राज्य आलं, शेतकरी कर्जमुक्ती योजनेवर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया
देवेंद्रजी, विरोधी पक्षनेते म्हणून कामाला लागा; शिवसेनेचा देवेंद्र फडणवीसांना सल्ला