Home महाराष्ट्र “राणेंना केंद्रीय गृहमंत्री केलं तरी शिवसेनेला फरक पडत नाही”

“राणेंना केंद्रीय गृहमंत्री केलं तरी शिवसेनेला फरक पडत नाही”

मुंबई : मोदींच्या मंत्रीमंडळाचा नव्याने विस्तार झाला. या मंत्रिमंडळात भाजप नेते नारायण राणे यांना स्थान देण्यात आलं. यावरुन शिवसेनेला शह देण्यासाठी राणेंनी मंत्रिमंडळात स्थान दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यावर शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

नारायण राणेंना केंद्रीय गृहमंत्री केलं तरी सेनेला फरक नाही. याआधीच सेनेनं आणि कोकणाने राणेंना धडा शिकवला आहे, असं वैभव नाईक यांनी म्हटलं आहे.  वैभव नाईक यांचे राणे पिता-पुत्रांसोबत अनेकवेळा खटके उडताना दिसतात. त्यामुळे त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर निलेश राणे, नितेश राणे काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान , मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार काल बुधवारी सायंकाळी पार पडला. त्यात नारायण राणे यांना सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“सरकारचं अपयश झाकण्यासाठी केंद्रातील मंत्रीच नाही, तर पंतप्रधान मोदींनाही बदलण्याची गरज”

मुंडे भगिनी नाराज नाहीत, अकारण बदनामी करू नका- देवेंद्र फडणवीस

“शिवसेनाप्रमुखांना राणेंची उंची माहीत होती, म्हणूनच त्यांनी राणेंना मुख्यमंत्रीपदी बसवलं”

रुपाली चाकणकरांना मी ओळखत नाही; चाकणकरांच्या बंटी-बबलीच्या टीकेला नवनीत राणांचं प्रत्युत्तर