मुंबई : भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांच्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एक मोठी जबाबदारी सोपविली आहे.
महाराष्ट्र भाजपच्या युवती विभागाच्या प्रभारीपदाची जबाबदारी चित्रा वाघ यांच्याकडे देण्यात आली आहे. चंद्रकांत पाटील यांनी पत्र लिहून चित्रा वाघ यांना देण्यात आलेल्या नव्या जबाबदारीविषयी कळवलं आहे.
सस्नेह नमस्कार… भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाच्या प्रदेश उपाध्यक्ष म्हणून आपण ही जबाबदारी मोठ्या जिद्दीने आणि अत्यंत कुशलतेने पार पाडत आहात… गेली अनेक वर्ष आपण सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्षमपणे कार्यरत आहात.. युवती व महिला यांच्या विषयातील आपला प्रदीर्घ अनुभव लक्षात घेऊन आपल्याकडे ‘भाजप महाराष्ट्र युवती विभागाच्या प्रभारी’ म्हणून विशेष जबाबदारी सोपविण्यात येत आहे… आगामी काळात आपण आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन ही जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडाल व त्याचा संघटनेला निश्चित फायदा होईल असा मला विश्वास आहे… आपल्या आगामी वाटचालीस माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा, असं चंद्रकांत पाटलांनी पत्रात म्हटलं आहे.
दरम्यान, भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश ने आज माझी भाजपा महाराष्ट्र – युवती विभागाच्या प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. पक्षाने दिलेली ही जबाबदारी मी उत्तमरीत्या पार पाडेन हा विश्वास देते, असं म्हणत चित्रा वाघ यांनी चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार यांचे मनापासून आभार मानले आहेत.
View this post on Instagram
महत्वाच्या घडामोडी –
“तुमच्या विरोधात बोललं की असंस्कृतपणा दिसतो, त्यामुळे मला सुसंस्कृतपणा तुम्ही शिकवू नका”
“प्रसिद्ध अभिनेत्री मंदिरा बेदी यांच्या पतीचे हृदयविकाराच्या झटक्यानं निधन”
“दहावी, बारावीचा निकाल 15 जुलैपर्यंत लागण्याची शक्यता; असा पाहू शकता निकाल”
“फडणवीसांनी संन्यास घेतला तर मराठी माणसाचा जाच संपेल”