कोल्हापूर : ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झाल्यानंतर आज भाजपने राज्यभर चक्काजाम आंदोलन केलं. भाजपच्या सर्व आघाडीच्या नेत्यांनी आपआपल्या भागात चक्का जाम करुन, ओबीसी आरक्षणाची मागणी केली आहे. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांना खुलं चॅलेंज दिलं आहे.
जर भाजपने ओबीसी समाजाचे आरक्षण घालवले असा आरोप होत असेल, तर कोल्हापूरच्या बिंदू चौकामध्ये कोणत्याही दिवशी चर्चेला तयार आहे. मंत्री छगन भुजबळ आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची समोरासमोर चर्चा होऊ दे, किमान त्यानंतर तरी जनतेच्या लक्षात येईल की ओबीसी आरक्षण नेमकं कुणामुळे रद्द झालं, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
दरम्यान, कोल्हापुरात चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरात दाभोळकर कॉर्नरला हे आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांनी चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक आंदोलकांना ताब्यात घेतलं.
महत्वाच्या घडामोडी –
“राज्यात पुन्हा कठोर निर्बंध लागू; पहा काय सुरू, काय बंद”
“देवेंद्र फडणवीस माझे गाॅडफादर, राजीनामा दिला तरी भाजपमध्येच राहणार”
“राज्य सरकारच्या हलगर्जीपणामुळे मराठा आरक्षण टिकलं नाही”
राज्यातील सरकारचा कारभार आणीबाणीची आठवण करुन देणारा- केशव उपाध्ये