नागपूर : ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यातच राज्य निवडणूक आयोगाने 5 जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समिती पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. या विरोधात भाजपने 26 जून रोजी राज्यव्यापी आंदोनलाची घोषणा करण्यात आली आहे. यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली.
राज्यव्यापी आंदोलनाच्या आगीत राज्यातील महाविकास आघाडी सरकार जळून जाईल, असा हल्लाबोल सुधीर मुनगंटीवार यांनी केला. तसेच 26 तारखेच्या आंदोलनात आम्ही प्रतिकात्मक शक्तीप्रदर्शन करणार आहोत. मात्र पुढे हे आंदोलन अधिक तीव्र होईल, असा इशारा सुधीर मुनगंटीवार यांनी दिला. ते नागपूरमध्ये बोलत होते.
ठाकरे सरकारनं ओबीसी समाजावर अन्याय केलाय, तर मराठा आरक्षण देण्यातही हे सरकार फेल ठरलंय, असं मुनगंटीवार यांनी म्हटलं. तसेच ओबीसी आरक्षण टिकवण्यात हे सरकार अपयशी ठरलं. हे सरकार कुंभकर्णापेक्षाही मोठी झोप घेत आहे, अशी टीका मुनगंटीवार यांनी यावेळी केली.
महत्वाच्या घडामोडी –
2024 मध्ये जनता मोदी सरकारला पायउतार केल्याशिवाय राहणार नाही- नाना पटोले
“राजस्थान राॅयल्सला मोठा धक्का! राजस्थानच्या ‘या’ स्टार खेळाडूची IPL च्या उर्वरित सामन्यांतून माघार”
“अहमदनगरमध्ये महापाैरपदाच्या निवडणूकीत शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र”
“महाविकास आघाडीतील ‘आणखी’ एक पक्ष स्वबळावर मैदानात”