मुंबई : गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या टाटा कॅन्सर रुग्णालयाला ‘म्हाडा’च्या 100 सदनिका देण्याच्या निर्णय राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत घेण्यात आला होता. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या निर्णयाला स्थगिती दिली. यावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी प्रतिक्रिया दिली.
गृहनिर्माणमंत्री जितेंद्रआव्हाड यांनी टाटा कॅन्सर हॉस्पिटलमधील रुग्णांच्या निवाऱ्यासाठी जवळच्या सुखकर्ता-विघ्नहर्ता सोसायटीत काही घरे देण्याचा निर्णय शरद पवार यांच्या उपस्थितीत जाहीर केला होता.परंतु सहीच्या एका फटकाऱ्यासह मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय रद्द केला.माणुसकी खड्ड्यात., असं ट्विट करत भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या या निर्णयाला महावसुली सरकारमधील सत्ता संघर्षाची किनार आहेत. आपणच बॉस असून पवारांना फाट्यावर मारतो हे मुख्यमंत्र्यांनी दाखवून दिले. परंतु कुरघोडीच्या राजकारणात त्यांनी माणुसकीचा मात्र बळी दिला. राजकारणाने नीच पातळी गाठली आहे., असा हल्लाबोल अतुल भातखळकर यांनी यावेळी केला.
मुख्यमंत्री @OfficeofUT यांच्या या निर्णयाला महावसुली सरकारमधील सत्ता संघर्षाची किनार आहेत. आपणच बॉस असून पवारांना फाट्यावर मारतो हे मुख्यमंत्र्यांनी दाखवून दिले. परंतु कुरघोडीच्या राजकारणात त्यांनी माणुसकीचा मात्र बळी दिला. राजकारणाने नीच पातळी गाठली आहे.
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) June 22, 2021
महत्वाच्या घडामोडी –
14 दिवसाचं अधिवेशन झालं तर…; सुधीर मुनगंटीवारांची ठाकरे सरकारवर टीका
सरकार पावसाळी अधिवेशनापासून पळ काढतंय- प्रवीण दरेकर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा परदेशात काळा पैसा, ईडीला पुरावे देणार; आमदार रवी राणांचा आरोप
मोदी आहेत नंबर वन, त्यामुळे….; रामदास आठवलेंचा त्यांच्या खास शैलीत विरोधकांना टोला