मुंबई : विदर्भामध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपच्या आजी-माजी 12 नगरसेवकांनी शिवबंधन बांधण्याचा निर्णय घेतला आहे.
विदर्भातील वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट नगरपरिषदेचे हे नगरसेवक आहेत. त्यामुळे विदर्भात भाजपला मोठा धक्का लागल्याचं चित्र आहे. निवडणुकीपूर्वी हिंगणघाट नगरपरिषदेतील भाजपचे 12 नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर येऊन ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत.
विदर्भातील हिंगणघाट नगरपालिकेतील उपाध्यक्ष चंद्रकांत घुसे यांच्यासह भाजपचे विद्यमान 10 नगरसेवक आणि 2 माजी नगरसेवक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्ष प्रवेश करत आहेत.
दरम्यान, हिंगणघाट नगरपालिकेवर सध्या भाजपचीच सत्ता आहे, असं असतानाही भाजपचे 10 विद्यमान नगरसेवक शिवसेनेत पक्ष प्रवेश करत आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
“पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसलेंची तब्बल 40 कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त”
“सत्ता गेल्यानं ज्यांच्या पोटात दुखत आहे, त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी सरकार 5 वर्ष चालणार”
“निवडणूक स्ट्रॅटेजिस्ट प्रशांत किशोर पुन्हा शरद पवारांच्या भेटीला, आता दिल्लीत खलबतं; चर्चांना उधाण”