मुंबई : सत्तेत एकत्र येऊन काँग्रेस-राष्ट्रवादी आपलेच कार्यकर्ते फोडत असेल, आपला पक्ष कमकुवत करत असेल तर पुन्हा एकदा आपण पंतप्रधान आदरणीय श्रा.नरेंद्र मोदीजी यांच्याशी जुळवून घेतलेलं बरं, असं माझं वैयक्तिक मत आहे, असं पत्र शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लिहिलं. प्रताप सरनाईकांनी केलेल्या मागणीमुळे महाविकास आघाडीमध्ये अंतर पडलं असल्याचं बोललं जात आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.
महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकमेकांसोबत मजबुतीने उभे आहोत. सत्ता गेल्याने ज्यांच्या पोटात दुखत आहे त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी सरकार पाच वर्ष चालणार. कितीही फूट पाडण्याचा प्रयत्न केला तरी यश मिळणार नाही, असं म्हणत संजय राऊत यांनी विरोधकांना चांगलंच सुनावलं. ते आज प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
दरम्यान, महाविकास आघाडीमध्ये असणारा समन्वय देशाच्या राजकारणात आदर्श आहे. आघाडीचं सरकार कसं चालवावं त्याचा उत्तम फॉर्म्यूला महाराष्ट्रात आहे, असा टोलाही संजय राऊतांनी यावेळी भाजपला लगावला.
महत्वाच्या घडामोडी –
“निवडणूक स्ट्रॅटेजिस्ट प्रशांत किशोर पुन्हा शरद पवारांच्या भेटीला, आता दिल्लीत खलबतं; चर्चांना उधाण”
“संजय राऊत यांना ज्या दिवशी शिवसैनिकच मारतील, त्यादिवशी…; निलेश राणेंचा हल्लाबोल
“राज्य सरकारचे कान फाटतील एवढ्या जोरात आंदोलन करणार”