Home महाराष्ट्र “मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या चक्रव्यूहातून बाहेर येऊन भाजपशी युती करावी”

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या चक्रव्यूहातून बाहेर येऊन भाजपशी युती करावी”

मुंबई : सत्तेत एकत्र येऊन काँग्रेस-राष्ट्रवादी आपलेच कार्यकर्ते फोडत असेल, आपला पक्ष कमकुवत करत असेल तर पुन्हा एकदा आपण पंतप्रधान आदरणीय श्रा.नरेंद्र मोदीजी यांच्याशी जुळवून घेतलेलं बरं, असं माझं वैयक्तिक मत आहे, असं पत्र शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लिहिलं. यावर केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली.

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून शिवसेना आणि भाजपने युती करावी अशी स्वागतार्ह भूमिका मांडली आहे. त्यांच्या या भूमिकेचे आपण स्वागत करीत असून उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी भाजपशी युती करावी, असं रामदास आठवले म्हणाले.

दरम्यान, दोन्ही काँग्रेसच्या दबावामुळे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना काम करणं अवघड होत आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी, दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार करण्यासाठी, छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार मजबूत करण्यासाठी शिवसेना-भाजपने एकत्र यावे, असं मत रामदास आठवले यांनी व्यक्त केलं.

महत्वाच्या घडामोडी –

महाराष्ट्रात ‘भगव्या’चं राज्य येत आहे…; नितेश राणेंच्या ट्विटने खळबळ

ठाकरे सरकारलाच कोरोनाची लागण, सरकार गेल्याशिवाय हा कोरोना बरा होणार नाही- सदाभाऊ खोत

प्रताप सरनाईक यांचं थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्रं; म्हणाले…

“बाळासाहेब ठाकरेंसाठी वाईट वाटतं, शिवसेनेची सुरूवात केली वाघांना घेऊन…संपणार कुत्र्यांमुळे”