Home महाराष्ट्र कुणी कितीही शड्डू ठोकले तरी पुढील महापाैर सुद्धा शिवसेनेचाच होणार- किशोरी पेडणेकर

कुणी कितीही शड्डू ठोकले तरी पुढील महापाैर सुद्धा शिवसेनेचाच होणार- किशोरी पेडणेकर

मुंबई : कुणी कितीही शड्डू ठोकला तरी पुढील महापाैर सुद्धा शिवसेनेचाच होणार, असं वक्तव्य मुंबईच्या महापाैर किशोरी पेडणेकर यांनी केलं.

आज शिवसेनेचा 55 वा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्याने किशोरी पेडणेकर यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला. त्यात त्या बोलत होत्या.

मुंबई ज्या पद्धतीने शिवसेना चालवतं आहे. ज्याप्रकारे मुंबईच्या नागरिकांची काळजी आम्ही घेतोय, त्यावरून पुढील येणाऱ्या काळात शिवसेनेचाच महापौर होणार, मग कुणी कितीही शड्डू ठोकला, तरी महापाैर हा शिवसेनेचाच होणआर, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

दरम्यान, शिवसेनेनं प्रत्येक निवडणुकीमध्ये संघर्ष केलेला आहे. प्रत्येक दिवसाला आम्हांला संघर्ष असतो. आमची शिवसेना ही चळवळ करणारी आहे. त्याचप्रमाणे आम्ही कोणाशी संघर्ष करायला जात नाही, आणि जर कोण आलं तर त्याला त्या संघर्षामध्ये घातल्याशिवाय राहत नाही, असंही किशोरी पेडणेकरांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

सत्ता गेल्यानं भाजपचा जीव कासावीस झालाय- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

संजय राऊत काय शिंगावर घेणार?, त्यांना शिंग आहे कुठे?- नारायण राणे

“शिवसेना ही शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर चालते, शिवसैनिक भगिनींवर वार करणार नाहीत”

“पुण्यामध्ये पुन्हा लाॅकडाऊन! महापाैर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करत दिली माहिती”