मुंबई : छत्रपती संभाजीराजे व छत्रपती उदयनराजे यांची आज पुण्यात बैठक पार पडली. अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेली ही भेट पार पडल्यानंतर, त्यावर राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“दोन्ही राजे मराठा समाजासाठी एकत्र आले याचा आनंद आहे. समाजाच्या हक्कासाठी आंदोलन करणे त्यात काही गैर नाही. मराठा समाजासोबतच दोन्ही राजेंनी ओबीसींच्या हक्कासाठी सुद्धा पाठिंबा द्यावा सहकार्य करावे ही विनंती.” असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
दोन्ही राजे मराठा समाजासाठी एकत्र आले याचा आनंद आहे. समाजाच्या हक्कासाठी आंदोलन करणे त्यात काही गैर नाही. मराठा समाजासोबतच दोन्ही राजेंनी ओबीसींच्या हक्कासाठी सुद्धा पाठिंबा द्यावा सहकार्य करावे ही विनंती.
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) June 14, 2021
महाराष्ट्रातील प्रत्येक ओबीसी आज आपल्या हक्कांबद्दल जागरूक आहे, आपले हक्क प्राप्त करण्यासाठी एकत्रित येऊन आवाज बुलंद करत आहे याचा अभिमान आहे. प्रत्येक गाव पातळीवर ओबीसींच्या हक्कांसाठी राबणारे हात असणे आवश्यक असून त्यासाठी ओबीसींचे राजकीय आरक्षण टिकणे अत्यंत गरजेचे आहे. असंही वडेट्टीवार यांनी या अगोदर पत्रकारपरिषदेत बोलून दाखवलेलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“मराठा आरक्षणासाठी एकत्र आलेल्या राजांचं स्वागत, पण त्यांचं बोलणं भाजपच्या मिठाला जागल्यासारखं”
पाच वर्षे उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री राहतील- नाना पटोले
…तर काँग्रेसने महाविकासआघाडी सरकारचा पाठिंबा काढावा- रामदास आठवले
नारायण राणे दिल्ली दौऱ्यावर; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची चिन्हं