Home महाराष्ट्र “स्वतःला वाघ म्हटल्यावर वाघ झाले असते तर जंगलातल्या वाघांची किंमत संपली असती”

“स्वतःला वाघ म्हटल्यावर वाघ झाले असते तर जंगलातल्या वाघांची किंमत संपली असती”

मुंबई : वाघाशी दोस्ती करायला आम्ही कधीही तयार आहोत. आमची दुश्मनी कधीच नव्हती. आमच्या नेत्याची इच्छा ही आमच्यासाठी आज्ञा असते. जर मोदीजींनी तशी इच्छा व्यक्त केली, तर वाघाशी दोस्ती करायला आम्ही तयार आहेच, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.

वाघाशी मैत्री होत नाही, वाघ ठरवतो कुणाशी मैत्री करायची, असा पलटवार संजय राऊत यांनी यावेळी केला. यावर आता भाजप नेते निलेश राणे यांनी संजय राऊतांना प्रत्युत्तर दिलं आहे. निलेश राणेंनी यासंदर्भात ट्विट केलं आहे.

नाक्यावरती उभे राहणारे टपोरी पण स्वतःला वाघ समजतात. वाघ बकरी नावाची चहा सुद्धा येते आणि टायगर नावाचा बाम पण येतो. स्वतःला वाघ म्हंटल्यावर वाघ झाले असते तर जंगलातल्या वाघांची किंमत संपली असती. लुक्क्यांना जास्त सवय असते स्वतःला वाघ म्हणायची., असं ट्विट करत निलेश राणे यांनी संजय राऊतांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

निवडणूक स्ट्रॅटेजिस्ट प्रशांत किशोर शरद पवारांच्या भेटीला; चर्चांना उधाण

“वाघ आता पिंजऱ्यातला झालाय, आमची दोस्ती जंगलातल्या वाघाशी होती”

“शिवसेना विश्वास असणारा पक्ष, स्व. बाळासाहेब ठाकरेंनीही इंदिरा गांधींना दिलेला शब्द पाळला होता”

“अखेर ठरलं! नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव”