Home महाराष्ट्र शिवसेना-भाजप युती पुन्हा होणार?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात…

शिवसेना-भाजप युती पुन्हा होणार?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात…

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकसत्ताला मुलाखत दिली. यात त्यांनी शिवसेना-भाजप युती आणि महाविकास आघाडीवर भाष्य केलं.

कोरोनामुळे तळागाळाच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचू शकलो नाही. शिवसेनेने जे केलं ते प्रामाणिकपणे केलं. भाजपशी 25-30 वर्ष युती केली, ती प्रेमाने केली आणि टिकवली. एका दिलाने, विचाराने एकत्र राहिलो. काय घडलं ते तुम्हांला माहिती आहे. आमची युतीतून बाहेर पडण्याची इच्छा नव्हती., असं उद्धव ठाकरेंनी यावेळी म्हटलं.

दरम्यान, जशी युती टिकली तशी आघाडी टिकेल. तीन पक्ष एकत्र आले आहेत. तिघांचा हेतू प्रामाणिक असेल, तोपर्यंत महाविकास आघाडी टिकेल, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

“सह्याद्री अतिथीगृहाच्या स्लॅबप्रमाणे सरकार कधी कोसळेल हे कळणार नाही”

कितीही हजारांचा पोलिस बंदोबस्त असू दे, मोर्चा निघणारच- विनायक मेटे

संसदेचं नेतृत्व करणाऱ्यांनी मराठा समाजाला न्याय देण्यासाठी वेळ दिला पाहिजे- जयंत पाटील

“महाराष्ट्रात 7 जूनपासून अनलाॅक, 5 टप्प्यात लाॅकडाऊन उठणार; पहा काय सुरू, काय बंद?”