मुंबई : मराठा आंदोलनाच्या मुद्द्यावरून खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक भूमिका घेत राज्य सरकारला 6 जूनपर्यंतचा अल्टिमेट दिला आहे. तसेच दुसरीकडे पदोन्नतीतील ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे भाजप सरकारवर टीका करत आहे. यावर भाजप नेते नारायण राणे यांनी प्रतिक्रिया देत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
मराठा आरक्षण स्थगितीला ठाकरे सरकारच जबाबदार आहे. मी 39 वर्षे शिवसेनेत होतो. त्यामुळे मराठा आरक्षणाबद्दल शिवसेनेची काय भूमिका आहे?, हे मला चांगलं माहिती आहे, असा हल्लाबोल नारायण राणे यांनी यावेळी केला.
दरम्यान, शरद पवारांनी मराठा समाज आणि आरक्षणाच्या बाजूने बोलण्याची गरज आहे, असं मत देखील नारायण राणेंनी यावेळी उपस्थित केलं.
महत्वाच्या घडामोडी –
…तर 2024 मध्ये काँग्रेस स्वबळावर सत्तेत येईल- नाना पटोले
“करोनाचा निर्णय म्हणजे खो-खो चा खेळ वाटला की काय सरकारला?”
नाथाभाऊ काय आमचे शत्रू नाहीत, ते अजूनही आमचे पालकच- चंद्रकांत पाटील
‘हे सरकार आहे की सर्कस?’; अतुल भातखळकरांची अनलॉकवरुन टीका