बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जवळचे कार्यकर्ते रविराज तावरे यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला आहे. या घटनेनंतर रविराज तावरे यांना बारामतीतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, रविराज तावरे आणि त्यांच्या पत्नी रोहिणी तावरे सायंकाळी पावणे सातच्या सुमारास येथील संभाजीनगरला वडापाव घेण्यासाठी आले होते. त्यानंतर त्याठिकाणी गाडीकडे येत असताना अचानक दुचाकीवर आलेल्या 2 जणांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यात रविराज तावरे यांना गोळी लागली. गोळी लागताच ते जमिनीवर कोसळले.
रोहिणी तावरे यांनी आरडाओरडा केल्यानंतर जवळच क्रिकेट खेळत असलेली पोरं धावत आली. सर्वांनी मिळून त्यांना उचलून गाडीत बसवलं. त्यानंतर त्यांना खाजगी रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं. त्यानंतर रूग्णालयात त्यांच्यावर तातडीचे उपचार सुरू करण्यात आले आहेत.
दरम्यान, रविराज तावरे हे माळेगावमधील राष्ट्रवादीचे मोठे नेते आहेत. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी खास पुण्यातून डाॅक्टरांची टीम बोलवण्यात आली आहे. मात्र त्यांच्यावर झालेल्या या हल्ल्यानंतर कार्यकर्त्यांकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहे.
महत्वाच्या घडामोडी –
…तर पुढची 100 वर्षे भाजप सत्तेत येणार नाही- संजय राऊत
संभाजीराजेंवर पाळत ठेवण्याचा प्रश्नच नाही, त्यांचा गैरसमज दुर केला; गृहमंत्र्यांचं स्पष्टीकरण
ओबीसी आरक्षणाबाबत भाजपची भूमिका म्हणजे मगरीचे अश्रू- नाना पटोले
आज पुन्हा पेट्रोल दरात वाढ; जाणून घ्या नवीन दर