देशातील किरकोळ इंधनाच्या किंमती विक्रम मोडत आहेत. आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सलग दुसर्या दिवशी वाढ करण्यात आली. आज सलग दुसऱ्या दिवशी किंमती वाढल्या आहेत. आज पेट्रोलच्या दरात 27 पैशांची वाढ झाली आहे, तर डिझेलच्या दरातही 23 पैशांची वाढ झाली आहे.
दोन दिवसांत पेट्रोल 56 पैशांनी महाग झाले आहे. सोमवारी पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 29 पैसे वाढ करण्यात आली. त्याचबरोबर आजच्या डिझेलच्या किंमतीत देखील वाढ करण्यात आली. दोन दिवसांत 49 पैशांनी महागले आहे.
मुंबईत पेट्रोलने शंभरी गाठली. आजच्या दरवाढीनंतर मुंबईत पेट्रोल 100.72 रुपये प्रतिलिटर तर डिझेल 92.69 रुपये प्रति लिटर विकलं जात आहे.
महत्वाच्या घडामोडी –
मराठ्यांना आरक्षण मिळावे या मताचे उद्धव ठाकरे कधीच नव्हते- नारायण राणे
सरकारला लाथा घातल्याशिवाय जाग येत नाही; EWS आरक्षणावरून विनायक मेटेंचा घणाघात
मराठा आरक्षणाच्या जबाबदारीतून पळ काढू नका; चंद्रकांत पाटलांचा ठाकरे सरकारला टोला