राज्य पुन्हा एकदा लाॅकडाऊनच्या उंबरठ्यावर- विजय वडेट्टीवार

0
168

मुंबई : राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यात लॉकडाऊनचे निर्णय घेण्यात येत आहे. यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राज्य पुन्हा एकदा लॅाकडाऊनच्या उंबरठ्यावर असून राज्यातील काही शहरात कडक निर्बंध घ्यावे लागतील, असा इशारा विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे. तसेच तामिळनाडूत परीक्षा न घेता सर्व विद्यार्थ्यांना पास केलं, राज्यात याबाबत विचार सुरु, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

दरम्यान, मुंबई लोकलमध्ये गर्दी कशी कमी होईल याचाही विचार सुरु आहे. तसेच सार्वजनिक कार्यक्रमावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली असून तसे आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, असंही विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“संजय राठोड यांचा राजीनामा घेतल्याशिवाय अधिवेशन चालू देणार नाही”

खेळपट्टी नव्हे तर सुमार फलंदाजीमुळे सामना 2 दिवसात संपला- विराट कोहली

“ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश आमटे यांना कोरोनाची लागण”

संजय राठोड प्रकरणी तुमच्या प्रतिमेला साजेशी वाघासारखी भूमिका घ्या- आशिष शेलार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here