मुंबई : मोदी सरकारला सात वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने एकीकडे भाजपाकडून वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे. तर दुसरीकडे काँग्रेससह इतर विरोधी पक्षांकडून आंदोलन करत टीका केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.
नरेंद्र मोदींनी 2014 च्या निवडणुकीत जनतेला खोटी स्वप्ने दाखवून सत्ता मिळवली, पण सात वर्षांत मोदी सरकार सर्व पातळ्यांवर अपयशी ठरलं आहे. मोदींनी आपल्या मनमानी कारभाराने 130 कोटी जनतेला कोरोनाच्या खाईत लोटले, त्यांना सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार राहिलेला नसून मोदींनी राजीनामा द्यावा, असं नाना पटोले म्हणाले आहेत.
दरम्यान, कोरोनाची परिस्थिती हाताळण्यातही मोदी सरकार सपशेल अपयशी ठरलं आहे. पहिल्या लाटेत नमस्ते ट्रम्पच्या आयोजनात व्यस्त राहिले आणि परिस्थिती अंगलट येताच तबलिगीच्या नावावर कोरोनाचे खापर फोडून धार्मिक रंग देण्याचा उद्योग केला, असंही नाना पटोले म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
काँग्रेसच्या काळात महागाईवर आंदोलन करणारे आता कुठं लपलेत?- बाळासाहेब थोरात
…तर बाळासाहेब वरुन थोबाडीत मारतील; चंद्रकांत पाटलांचा टोला
चंद्रकांतदादांना काय बोलावं हे कळत नाही, त्यांना मस्ती आली आहे; हसन मुश्रीफांचा हल्लाबोल
‘या’ सरकारच्या बेफिकीरीमुळेच ओबीसींचं आरक्षण गेलं- चंद्रशेखर बावनकुळे