मुंबई : मराठा आरक्षणाला भाजपाकडूनच विरोध केला जात असल्याचा आरोप काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत यांनी काही केला आहे. सचिन सावंत यांनी सेव्ह मेरीट सेव्ह नेशन संघटनेचे मूळ संस्थापक डॉ. अनुप मरार हे भाजपाचे पदाधिकारी असल्याचे कागदपत्रे ट्विट केली आहेत.
“मराठा आरक्षणाला निकराने विरोध करणाऱ्या Save Merit Save Nation संघटनेचे मूळ संस्थापक ज्यांनी स्वतःचा पत्त्यावर ही संस्था स्थापन केली, ते डॉ अनुप मरार हे भाजपाचे पदाधिकारी कसे? महाराष्ट्र भाजपाने उत्तर द्यावे, असं सचिन सावंत यांनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, चंद्रकांत पाटीलजी, ही भाजपा ची मराठा समाजाशी गद्दारी नाही का?,” असा सवालही सचिन सावंत यांनी यावेळी केला आहे.
डॉ अनुप मरार व इतर संघाशी संबंधित या संस्थेचे विश्वस्त नागपुरात मराठा आरक्षणाविरोधात मोर्चे काढत होते तेव्हा भाजपा गप्प का होती? न्यायालयात हे लोक मराठा आरक्षणाला विरोध करत होते तेव्हा भाजपा गप्प का होती? हे मूक समर्थन होते का? मागून पाठिंबा दिला का? @BJP4Maharashtra उत्तर द्या pic.twitter.com/YkPsHlgidS
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) May 28, 2021
महत्वाच्या घडामोडी –
खासदार छत्रपती संभाजी राजे नवीन पक्ष स्थापन करणार?; सोशल मीडियात जोरदार चर्चा
चंद्रकांतदादांना स्वप्नं बघण्याचा छंद; जयंत पाटलांचा चंद्रकांत पाटलांना टोला
पेट्रोलने शंभरी गाठली! दाढीवाला फलंदाज आणि मॅन ऑफ दि मॅच; ठाण्यात राष्ट्रवादीची होर्डिंगबाजी
पंतप्रधान मोदींमध्ये अधिवेशन घेण्याची हिम्मत आहे की नाही?- जयंत पाटील