मुंबई : मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर राज्यातील नेत्यांची भूमिका जाणून घेण्यासाठी खासदार संभाजीराजेंनी महाराष्ट्र दौरा केला. त्यानंतर त्यांनी आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका जाहीर केली.
संभाजीराजेंनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत संभाजीराजेंनी मुख्यमंत्र्यांना 5 गोष्टी सांगितल्या.
1) 9 सप्टेंबर 2020 पर्यंत नियुक्त्या झाल्यात त्यांना रुजू करुन घ्या हे सांगितलं, मग राज्य सरकार थांबलंय का? लोकांच्या भावनांशी का खेळताय? गरिब मराठ्यांना न्याय द्या
2) शाहू महाराजांच्या नावाने सारथी संस्था उभी केली, मात्र त्याची अवस्था काय आहे? सारथीला स्वायत्तता दिली तर आरक्षणापेक्षाही उत्तम ठरेल. माझं हे मोठं वक्तव्य आहे. सारथीला चालना मिळाली तर समाज बदलेल. सारथीचं अध्यक्षपद मला अजिबात नको. सारथीला 1 हजार कोटी द्या. कोव्हिड काळात पैसा नाही म्हणता, पण आम्ही प्लॅन करु. आता ५० कोटी दिले तर त्यामध्ये आम्ही काय प्लॅन करु? पैसे द्यायचे नसतील तर ती सारथी संस्था बंद करा. शाहू महाराजांच्या नावे अशी संस्था नको
3) अण्णासाहेब महामंडळातून गरीब मराठ्यांना उद्योग उभं करुन देऊ शकता. दहा लाखाचं लिमिट आहे. मात्र ही मर्यादा 25 लाख करा. कर्ज काढायला गेल्यावर जमीन मॉर्गेज मागतात, मात्र जमिनीच नाहीत तर देणार काय?
4) प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह उभा करा. ते तुमच्या हातात आहे, ते करा.
5) 70 टक्के गरीब मराठा समाज आहे. मी शाहूंचा वंशज आहे. गरिबांवर अन्याय होऊ देणार नाही. ज्या सवलती शिक्षणामध्ये ओबीसींना मिळतात, त्या गरीब मराठ्यांनाही द्या.
दरम्यान, 7 जूनपर्यंत जर सरकारनं मी सांगितलेल्या पाच गोष्टींवर निर्णय घेतला नाही, तर आम्ही कोविड वगैरे काही बघणार नाही, असा इशारा संभाजीराजे छत्रपतींनी दिला. तसेच 6 जूनपर्यंत मी अल्टिमेटम देत आहे. त्यानंतर रायगडावरून आंदोलनाला सुरुवात करणार असल्याचा निर्धारही संभाजीराजे छत्रपतींनी बोलून दाखवला.
महत्वाच्या घडामोडी –
“चंद्रकांत पाटीलजी, ही भाजपा ची मराठा समाजाशी गद्दारी नाही का?”
खासदार छत्रपती संभाजी राजे नवीन पक्ष स्थापन करणार?; सोशल मीडियात जोरदार चर्चा
चंद्रकांतदादांना स्वप्नं बघण्याचा छंद; जयंत पाटलांचा चंद्रकांत पाटलांना टोला
पेट्रोलने शंभरी गाठली! दाढीवाला फलंदाज आणि मॅन ऑफ दि मॅच; ठाण्यात राष्ट्रवादीची होर्डिंगबाजी