मुंबई : मागील अनेक दिवसांपासून सामाजिक कार्यकर्त्यांसह चंद्रपूरमधील शेकडो गावांनी दारुबंदी कायम ठेवण्याच्या मागणीसाठी आंदोलन केलं. मात्र, ठाकरे सरकारने हा विरोध झुगारुन चंद्रपूरमधील दारु बंदी उठवण्याचा मोठा निर्णय घेतला. या निर्णयावरुन भाजप नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधलाय.
वसुली सरकारला काँग्रेस मंत्र्यांसाठी बहुजनांच्या हितापेक्षा दारू विक्रेत्यांकडून मिळणाऱ्या ‘मेव्या’चा ‘हेवा’ आहे. सरकारला हा मेवा जास्त महत्वाचा वाटतो,” असं गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत.ते ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते.
दरम्यान, काँग्रेस नेते आणि मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी मागील काही काळापासून चंद्रपूरमधील दारुबंदी हटवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले होते. परिणामी आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चंद्रपूरमधील दारूबंदी उठवण्याचा निर्णय घेण्यात आला.
महत्वाच्या घडामोडी –
अबब..! अंत्यसंस्कार केलेली व्यक्ती घरी परतली; कुटुंबियांची झोपच उडाली
“महेंद्रसिंग धोनीचा चेन्नई सुपर किंग्सला गुडबाय?”
“नष्ट झालेल्या घरांसाठी दीड लाख, झोपडपट्ट्यांसाठी 15 हजार; ताैत्के चक्रीवादळग्रस्तांसाठी मदत जाहीर”
महाविकास आघाडीचे सरकार पडणार ही खरंच अफवा असेल तर…; नितेश राणेंचा हल्लाबोल