मुंबई : तौत्के चक्रीवादळानं सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात जोरदार फटका बसला. यात अनेकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. त्यामुळे तौत्के चक्रीवादळग्रस्तांना वाढीव दराने मदत देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
केंद्र शासनाने विहित केलेल्या दरापेक्षा अधिक दराने मदत देण्यात येणार. वाढीव दरामुळे पडणारा आर्थिक भार राज्य शासनाच्या निधीमधून करण्यास मान्यता देण्यात आल्याचंही बैठक संपल्यानंतर सांगण्यात आलं आहे.
.@VijayWadettiwar pic.twitter.com/IbkiHDFDvW
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 27, 2021
तौत्के चक्रीवादळामुळे ज्यांचं घर संपूर्ण उद्ध्वस्त झालं आहे त्यांच्यासाठी राज्य सरकारकडून 1 लाख 50 हजार रुपयांची मदत केली जाणार आहे. तसेच ज्यांच्या घरांचं किमान 15 टक्के नुकसान झालं आहे अशा घरांसाठी 15 हजार रुपये, 25 टक्के नुकसान झालेल्या घरांसाठी 25 हजार रुपये, तर किमान 50 टक्के नुकसान झालेल्या घरांसाठी 50 हजार रुपयांची मदत सरकारकडून देण्यात येईल. तसेच बोटींची अंशत: दुरूस्ती करण्यासाठी 10 हजार रुपये, पूर्णत: नष्ट झालेल्या बोटींसाठी 25 हजार रुपये. तर अंशत: बाधित झालेल्या जाळयांच्या दुरूस्तीसाठी 5 हजार रुपये, पूर्णत: नष्ट झालेल्या जाळयांसाठी 5 हजार रुपये मदतची घोषणा करण्यात आलीय.
जे स्थानिक रहिवाशी आहेत, ज्यांचं नाव स्थानिक मतदार यादीत आहे आणि जे रेशनकार्ड धारक आहेत, त्यांना पंचनाम्याच्या आधारे प्रत्यक्ष झालेल्या नुकसानीच्या 75 टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त 10 हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत सरकारकडून देण्यात येणार आहे. तसेच नष्ट झालेल्या झोपडपट्टी पुनर्वसनासाठी पात्र असलेल्या झोपडयांना मदत म्हणून रू. 15,000 प्रति झोपडी अशी मदत देण्यात येणार आहे. तसेच घरातील कपड्यांचे आणि भांड्यांचे नुकसान झालेल्या नागरिकांना 5-5 हजार रुपयांची मदत सरकारकडून देण्यात येणार आहे.
#मंत्रिमंडळनिर्णय
राज्यामध्ये #TauktaeCyclone मुळे बाधित आपदग्रस्तांना वाढीव दराने मदत देण्याचा निर्णय. केंद्र शासनाने विहित केलेल्या दरापेक्षा अधिक दराने मदत देण्यात येणार. वाढीव दरामुळे पडणारा आर्थिक भार राज्य शासनाच्या निधीमधून करण्यास मान्यता. pic.twitter.com/gPO2IRg8e5— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) May 27, 2021
महत्वाच्या घडामोडी –
महाविकास आघाडीचे सरकार पडणार ही खरंच अफवा असेल तर…; नितेश राणेंचा हल्लाबोल
1 जूननंतर लाॅकडाऊन टप्प्या टप्प्यानं उठविणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
“राजे, वाटेल तसा आरक्षणाचा विषय वापरायला मराठा समाजाने तुम्हाला ठेका दिलेला नाही”
“जयंत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करा, अन्यथा…”