Home महाराष्ट्र सरकार टिकवणं ही एकट्या शिवसेनेची जबाबदारी नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

सरकार टिकवणं ही एकट्या शिवसेनेची जबाबदारी नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : गेल्या काही दिवसांत महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले होते. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी आपली नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे.

सरकार टिकवणे ही एकट्या शिवसेनेचीच जबाबदारी नाही, असं उद्धव ठाकरे यांनी काल शरद पवारांना सांगितलं. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत राष्ट्रवादीच्या मंत्र्यांसोबत झालेली खडाजंगी, काही मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कारभारावरून केलेली टीका, मंत्री आवाज चढवून मंत्रिमंडळ बैठकीत बोलत असल्याबाबत नाराजी या सर्व पार्श्वभूमीवर काल शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी, काँग्रेसच्या पुढाकाराने सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे हे सरकार टिकवणे ही केवळ शिवसेनेचीच जबाबदारी नसल्याचं उद्धव ठाकरेंनी शरद पवारांना सांगितलं असल्याची माहिती कळत आहे.

महत्वाच्या घडामोडी –

भाजपानं पक्ष म्हणून किती सन्मान दिला हे संभाजीराजे सांगत नाहीयेत- चंद्रकांत पाटील

“शिवसेना नाराज ही केवळ अफवा, शरद पवारांचा या सरकारला पूर्ण आशीर्वाद असून सरकार 5 वर्ष चालणार”

मी भाजपा ची पोलखोल करणार; सचिन सावंतांचा इशारा

मालकाच्या कर्तृत्वाचं असं जाहीर पोतेरं करू नये; अतुल भातखळकरांचा संजय राऊतांना टोला